दुचाकीवरील संशयितांनी दोन लाखांची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 19:00 IST2018-09-10T18:59:21+5:302018-09-10T19:00:01+5:30
नाशिक : रस्त्याने जात असलेल्या वाईन शॉप मॅनेजरकडील एक लाख ९० हजार रुपये ठेवलेली बॅग दुचाकीवरील तिघा संशयितांनी धक्का देत बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील बारदान फाट्याजवळ घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

दुचाकीवरील संशयितांनी दोन लाखांची रोकड पळविली
नाशिक : रस्त्याने जात असलेल्या वाईन शॉप मॅनेजरकडील एक लाख ९० हजार रुपये ठेवलेली बॅग दुचाकीवरील तिघा संशयितांनी धक्का देत बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (दि़९) रात्रीच्या सुमारास गंगापूर रोडवरील बारदान फाट्याजवळ घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ध्रुवनगरमधील रहिवासी राजेंद्र चौधरी हे गंगापूर रोडवरील एका वाईन दुकानात मॅनेजरचे काम करतात़ रविवारी रात्री साडेदहा ते पावणेअकरा वाजेच्या सुमारास ते बारदान फाट्याजवळून जात होते़ यावेळी यामाहा कंपनीच्या एफझेड दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांपैकी एकाने त्यांना धक्का दिला तर दुसऱ्याने १ लाख ९० हजार रुपये असलेली बॅग बळजबरीने हिसकावून नेली़
या घटनेची माहिती त्यांनी गंगापूर पोलिसांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते़ दरम्यान, या तिघा संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे़