दुचाकीवर हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:54 IST2018-12-04T17:54:42+5:302018-12-04T17:54:54+5:30
सिन्नर: दुचाकीवरून जात असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन खाली पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर आयटीआय परिसरात घडली.

दुचाकीवर हृदयविकाराचा धक्का बसून मृत्यू
सिन्नर: दुचाकीवरून जात असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन खाली पडलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर आयटीआय परिसरात घडली. मृत झालेले दुचाकीस्वार चाटोरी येथील रहिवासी आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत गुलाबराव रामकृष्ण घोलप (४४, रा. चाटोरी) हे सोमवारी सिन्नर येथून चाटोरीकडे दुचाकीवरून जात होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नायगाव रस्त्याने दुचाकीने जात असताना सिन्नरजवळील आयटीआयजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात दुचाकीवरून ते खाली कोसळल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचे निधन झाले होते. याप्रकरणी त्यांचे भाऊ दिलीप रामकृष्ण घोलप यांनी दिलेल्या माहितीवरून सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार मोरे पुढील तपास करीत आहेत.