अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:54 IST2020-02-26T23:53:46+5:302020-02-26T23:54:07+5:30

त्र्यंबकेश्वर : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला.

Two-wheeler killed by unidentified vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

ठळक मुद्दे जखमींना त्र्यंबकेश्वर येथील रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

त्र्यंबकेश्वर : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला.
त्र्यंबकेश्वरहून आपल्या घरी जात असलेल्या दुचाकी एमएच १५ सीटी ४६७३ वर बसून तिघे नाशिककडे जात ैहोते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तेजस मुरलीधर देहाडे (१८) हा जागीच ठार झाला. तर सचिन हरी गांगुर्डे (२५) व गौरव निवृत्ती पालवे (१९) दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना त्र्यंबकेश्वर येथील रुग्णवाहिकेतून नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदरचा अपघात घोटी-वैतरणा मार्गावरील पेगलवाडी शिवारातील श्री साई मंदिर परिसरात घडण्यात आल्याचे सांगितले जाते.
वरील तिघेही युवक त्र्यंबकेश्वरमधील वाहनतळावर काम करीत होते. याबाबत सपोनि रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट एएसआय सुनील आहेर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed by unidentified vehicle