ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 01:22 IST2021-10-08T01:21:37+5:302021-10-08T01:22:01+5:30

दत्त मंदिर सिग्नलजवळील आर्चिज गॅलरीसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकास पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

Two-wheeler killed in truck crash | ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक : दत्त मंदिर सिग्नलजवळील आर्चिज गॅलरीसमोर दुचाकीवरून जाणाऱ्या सराफ व्यावसायिकास पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. जेलरोड, ढिकले मळा, दंडे रो-हाऊस येथे राहणारे सराफ व्यावसायिक नंदकुमार रामकृष्ण दहिवाल (४९) हे बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्प्लेन्डर (एमएच १५ जीवाय ४०७६) दुचाकीवरून व्दारकेहून नाशिकरोडच्या देवी चौकातील दुकानाकडे येत होते. आर्चिज गॅलरीसमोर जात असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने (एमएच १३ सीयू २८६२) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दहिवाल जखमी होऊन जागीच मयत झाले. याप्रकरणी ट्रकचालक कुबेर ज्ञानदेव कुटे (बार्शी, सोलापूर) याच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहिवाल यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानकपणे झालेल्या अपघातीमृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Two-wheeler killed in truck crash