स्वीफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 01:16 IST2021-09-10T01:15:22+5:302021-09-10T01:16:11+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर स्वीफ्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव शिवारात बँक ऑफ इंडियासमोर सदर अपघात झाला.

Two-wheeler killed in Swift car crash | स्वीफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

स्वीफ्ट कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर स्वीफ्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माळेगाव शिवारात बँक ऑफ इंडियासमोर सदर अपघात झाला.

दीपक दगडू मोरे (३५, रा. वाडे ता. भडगाव हल्ली रा. उद्योगभवन, सिन्नर हा दुचाकीने (एम. एच. १५ एच एफ. २६२२) ने जात असताना सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट कार (एम. एच. १५ डी. सी. १००९) ने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दीपक मोरे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in Swift car crash