Two-wheeler killed in a raid | भडाणे शिवारात दुचाकीस्वार ठार
भडाणे शिवारात दुचाकीस्वार ठार

चांदवड : तालुक्यातील भडाणे शिवारात लासलगाव-मनमाड रोडवर छोटा हत्ती व दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीस्वार ठार झाला. निफाड तालुक्यातील देवगाव येथील पुंडलिक रामभाऊ सोनवणे (४८) हे प्लॅटिना दुचकीने (क्रमांक एमएच १५, बीझेड १८५५) मनमाडकडून लासलगावकडे जात असताना भडाणे शिवारातीत भारतनगरजवळ समोरून येणारा छोटा हत्ती टेम्पो (एमएच १५, बीजे ५८३२) व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुंडलिक सोनवणे हे ठार झाले. याबाबतची खबर भडाणेचे पोलीस पाटील सागर आहेर यांनी चांदवड पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in a raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.