अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 01:51 IST2022-05-16T01:49:58+5:302022-05-16T01:51:10+5:30
दिंडोरी रोडने म्हसरूळ चौकात जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील अक्षय नंदू बस्ते (२०) हा तरुण ठार झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय याने हेल्मेट परिधान केलेले असतानाही त्याच्या डोक्याला जबर मार बसला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पंचवटी : दिंडोरी रोडने म्हसरूळ चौकात जाणाऱ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील अक्षय नंदू बस्ते (२०) हा तरुण ठार झाला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय याने हेल्मेट परिधान केलेले असतानाही त्याच्या डोक्याला जबर मार बसला.
म्हसरूळ येथे शनिवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास अक्षय हा त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच १५, इके ३८१६)वरून जात असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या धडकेत अक्षय खाली कोसळला. यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार बसला. तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लक्ष्मण श्रीराम शिंदे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, अपघातानंतर वाहनचालकाने वाहन घेऊन पोबारा केला. दुचाकीस्वार बस्ते याने दुचाकी चालवताना डोक्यात हेल्मेट परिधान केले होते. मात्र, वाहनाने धडक दिल्याने अक्षय खाली पडला व यावेळी हेल्मेटचा बेल्ट तुटला आणि डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.