आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 00:32 IST2020-11-11T00:29:19+5:302020-11-11T00:32:45+5:30
पुणे महामार्गावरील विजय-ममता सिग्नलजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत बजाज प्लॅटिनाचा दुचाकीचालक सोपान हनुमंत वाळके (३०,रा. वाळकेवाडी, पिंपळद) जागीच ठार झाला.

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
नाशिक : पुणे महामार्गावरील विजय-ममता सिग्नलजवळ भरधाव आयशर ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. या धडकेत बजाज प्लॅटिनाचा दुचाकीचालक सोपान हनुमंत वाळके (३०,रा. वाळकेवाडी, पिंपळद) जागीच ठार झाला. आयशर ट्रकचालकाने (एमएच१५ डीके ५९११) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत समोरील दुचाकीचालकाच्या वाहनाला धडक दिल्यानंतर त्यापुढील फॉक्सवॅगन कारला (एम.एच.१४ जीएस ७३१३) धडक दिली. या धडकेत कारचे नुकसान झाले. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अनिल वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.