काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:49 IST2021-01-29T19:43:49+5:302021-01-30T00:49:16+5:30

मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबायती शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या काळी पिवळी गाडीने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात काळी पिवळी गाडी (क्र. एमएच ४१ ई ४७७०) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Two-wheeler killed in black-and-yellow collision | काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

काळीपिवळीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बापू रामदास कुवर (२९) रा, वंजारवाडी ता. नांदगाव (हल्ली राहणार लहवीत स्टेशन ता. नाशिक) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. संशयित आरोपी काळी पिवळी गाडी मनमाडकडून मालेगावकडे भरधाव वेगात चालवून घेऊन जात असताना मनमाडकडे जाणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच ४१ बी-४८१८) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार साखरचंद भाऊराव कुवर (४८) रा. वंजारवाडी ता. नांदगाव यास गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले. त्याच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.

Web Title: Two-wheeler killed in black-and-yellow collision