Two-wheeler accident on Mumbai-Agra highway; One killed | मुंबई -आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या आपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू

मुंबई -आग्रा महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या आपघातातील जखमी व्यक्तीचा मृत्यू

ठळक मुद्देमहामार्गावर दुचाकी घसरुन अपघात नाशिकला येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : नामपूरहून ओझरमार्गे मुंबई-आग्रा महामार्गाने नाशिकला येत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) रात्री घडली आहे. 
मुंबई-आग्रा महामार्गावर के. के. वाघ महाविद्यालयासमोर झालेल्या या अपघातात रघुनाथ विठ्ठल भामरे (४२, रा. आनंद छाया बसस्टॉप, सातपूर) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार, रघुनाथ भामरे हे त्यांच्या दुचाकीवरून ओझरकडून नाशिक शहराकडे येत होते. के. के. वाघ महाविद्यालयासमोर त्यांची दुचाकी घसरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे वाहतुक कमी झाल्याने मुंबई-आग्रा महामार्गावर गेल्या काही महिन्यांमध्ये अपघाताचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, आता पुन्हा वाहतुक वाढली असून वेगवेगऴ्या कारणांनी नागरिक घराबाहेर पडत असताना वाहनांची वर्दळही वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अपघाताच्या घटना घडू लागल्या असून अशाच घटनेत आणखी एका दुचाकीस्वारास त्याचा जीव गमवावा लागला आहे. 

Web Title: Two-wheeler accident on Mumbai-Agra highway; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.