दोघा चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:25 IST2018-12-15T22:45:30+5:302018-12-16T00:25:32+5:30
रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले.

दोघा चोरट्यांना अटक
नाशिकरोड : परिसरात रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभ्या असलेल्या रिक्षाच्या स्टेपनी, टेप, आरसे आदी साहित्य चोरणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिकरोड पोलिसांनी पकडून चोरलेले साहित्य जप्त केले.
सिन्नरफाटा, सामनगाव परिसरांतून रात्री घराबाहेर लावलेल्या ८-१० रिक्षांच्या स्टेपनी, आरसे, टेप, स्पिकर, एका ट्रकच्या बॅटरी चोरीला गेली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, मुदस्सर पठाण, महेश सावळे, कय्युम सय्यद, विशाल पाटील, निखिल वाघचौरे आदिंनी रेल्वेस्थानक परिसरातील दीपक हॉटेलजवळ सापळा रचून संशयित हर्षद काशीनाथ देवरे (२६) रा. देवळाली गाव, साजिद हसन खान (२८) रा. विहितगाव या दोघांना पकडून त्यांची कसून चौकशी केली.
हॉटेलमधून रोकड लंपास
नाशिक : गंगापूररोडवरील आकाशवाणी टॉवरजवळील महाराष्ट्र दरबार हॉटेलच्या गल्ल्यातून चोरट्यांनी साठ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़
याप्रकरणी मोसीन उस्मान शेख (२५, रा. श्रीकृष्णनगर, सातपूर कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.