भावडे फाट्याजवळ अपघातात दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 14:57 IST2018-09-05T14:57:17+5:302018-09-05T14:57:38+5:30
माळवाडी : देवळा तालुक्यातील भावडे फाट्याजवळ कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले.

भावडे फाट्याजवळ अपघातात दोन गंभीर
माळवाडी : देवळा तालुक्यातील भावडे फाट्याजवळ कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले. मुंजवाड (ता सटाणा ) येथील एकनाथ जाधव व त्यांचे पुतणे कांदे विकण्यासाठी पिंपळगाव येथे जात असताना मागून भरधाव वेगात येणा-या ट्रकने धडक दिली. यात दोघेही जखमी झो आहेत, त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कालच या ठिकाणी बस आणि ट्रक यांच्यात अपघात होवून चार ठार झाले होते. हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र बनल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विंचूर - प्रकाशा राज्यमार्गा-वरील भाबडबारी घाट ते माळवाडी या १२ कि.मी. रस्त्यावर सातत्याने वाहनांचे अपघात होत असून, त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याचे विस्तारीकरण करून रस्त्यावर दुभाजक टाकण्याची मागणी लाल फितीतच अडकली आहे. विंचूर - प्रकाशा या मार्गावरून राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भाबडबारी ते माळवाडीदरम्यान कापशी, भावडे, मकरंदवाडी, रामेश्वर, गुंजाळनगर, देवळा व माळवाडी आदी गावे येतात. या सुमारे १२ कि.मी. मार्गावर अपघातांचे प्रमाणात वाढ होत असून, अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत.