नांदगावी कार-दुचाकी अपघातात दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:21 IST2021-01-14T00:20:38+5:302021-01-14T00:21:29+5:30
नांदगाव : शहरानजीक शांतीबागेजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून कारचालकाला किरकोळ दुखापत झाली.

नांदगावी कार-दुचाकी अपघातात दोन गंभीर
नांदगाव : शहरानजीक शांतीबागेजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून कारचालकाला किरकोळ दुखापत झाली.
बुधवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सदर अपघात घडला. नांदगाव-वेहेळगाव रोडवर वेहेळगावहून नांदगावकडे येणारी कार (क्र. एमएच ४१ एडी ५१३६) आणि विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी (क्र. एमएच ४१ एस ९३७०) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील गणेश चकोर (२६, रा. वेहेळगाव) व त्याच्या पाठीमागे बसलेली राजस्थानी व्यक्ती (नाव माहीत नाही) या दोघांच्या हात व पायांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नांदगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी मालेगावी हलविण्यात आले. या अपघातात दुचाकीस्वार कारच्या पुढील काचेवर आदळल्याने काच फुटली. त्यात कारचालक पवन नाराडे (रा. मुंबई, मूळ रहिवासी वेहेळगाव) हे काच लागून जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करणे सुरू होते. दरम्यान, याच रोडवर गिरणानगर येथे पिकअप व दुचाकी यांचा अपघात झाल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.