चाचडगाव येथे अपघातात दोन साईभक्त ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:16 IST2021-01-11T01:16:04+5:302021-01-11T01:16:54+5:30
दिंडोरी तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे,

चाचडगाव येथे अपघातात दोन साईभक्त ठार
दिंडोरी : तालुक्यातील नाशिक पेठ रस्त्यावर चाचडगाव शिवारात पिकअप वाहनाने रस्त्याने पायी शिर्डी जाणाऱ्या साईभक्तांना धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली आहे,
याबाबत वृत्त असे की रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव शिवारात पेठ कडून नाशिककडे पायी जाणाऱ्या दमण येथील भाविकांना एका अज्ञात पिकअप चालकाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने झालेल्या अपघातात मनीष धर्मेश हडपती(१५) व अश्विन ईश्वर पटेल (३५) हे दोघे रा. दमण गंभीर जखमी होऊन मृत झाले, तर त्यांच्यासोबत असलेले हरीशभाई बाबुभाई पटेल राहणार दमण हे गंभीर जखमी झाले, अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याबाबत दिंडोरी पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, युवराज खांडवी अधिक तपास करीत आहेत.