शहरातून दोन दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:14 IST2018-11-17T18:14:04+5:302018-11-17T18:14:32+5:30
नाशिक : सोनसाखळी व घरफोडी याबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनाही शहरात मोठ्या प्रमाणात घडत असून, याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ शहरातील आर्टिलरी सेंटर व कॉलेजरोड परिसरातून दोन दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर व पिंपळगाव पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्टिलरी सेंटर रोडवरील सुवर्णा सोसायटीतील रहिवासी अजय राजभर यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एचआर ०१, पी ८०५९) संशयित प्रवीण ऊर्फ चाफा निंबाजी काळे याने सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोतील पाटीलनगरमधील रहिवासी सतीश कांबळे यांची २० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच २०, सीएल १७४१ ) चोरट्यांनी कॉलेज रोडवरील क्रोमा शोरूमच्या पार्किंगमधून चोरून नेली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़