वणी परिसरात दोन अपघातात दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 00:55 IST2020-11-28T00:54:47+5:302020-11-28T00:55:48+5:30
ओझरखेड धरण परिसर व खोरी फाटा परिसरात झालेल्या अपघातांमध्ये दोन जणांनी जीव गमावला आहे.

वणी परिसरात दोन अपघातात दोघे ठार
वणी : ओझरखेड धरण परिसर व खोरी फाटा परिसरात झालेल्या अपघातांमध्ये दोन जणांनी जीव गमावला आहे.
नारायण वाळू लाखन (वय ३०, रा. माळुंगा, वघई, जि. डांग) हा युवक दुचाकीवरून (क्र. जीजे १५ एएन ३४८९) वणी- दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड परिसरातून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात नारायण लाखन हे जागीच ठार झाले. अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. शुक्रवारी (दि. २७) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
दुसरा अपघात वणी-सापुतारा रस्त्यावर खोरी फाटा परिसरात झाला. सुनीलाल देवराम पाडवी (वय ५०, राहा. जयपूर, ता. कळवण) हा इसम दुचाकीवरून (एमएच ४१ एच ९८२८) जात असताना आयशर वाहनाने (एमएच ४८ एवाय ३८०५) दुचाकीला जबर धडक दिल्याने पाडवी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.