मालेगावी अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 17:03 IST2021-05-29T17:02:52+5:302021-05-29T17:03:23+5:30

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात ट्रक, टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

Two killed in Malegaon accident | मालेगावी अपघातात दोघे ठार

मालेगावी अपघातात दोघे ठार

ठळक मुद्देसाकुरी (नि) ला शेतीच्या वादातून हाणामारी

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात ट्रक, टेम्पो, दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री दोन वाजता हा अपघात घडला. पवारवाडी शिवारात ट्रक व टेम्पोचा अपघात दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील सुफियान अहमद इलियास अहमद (२९, रा. किल्ला झोपडपट्टी) याच्यासह टेम्पोवर झोपलेल्या राजस्थान येथील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुचाकीवरील मोहम्मद अनिस मो. आलम (१९) हा जखमी झाला आहे. या अपघाताचा पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.

------------------
विवाहितेचा छळ करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फातमा मोहम्मद रिजवान. रा. दातारनगर या महिलेने फिर्याद दिली आहे. पती मोहम्मद रिजवान मोहम्मद पीर यांच्यासह नऊ जणांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार एस. सी. मोरे करीत आहे.

साकुरी (नि) ला शेतीच्या वादातून हाणामारी
मालेगाव : तालुक्यातील साकुरी येथे वहीवाटीवरून शेतकऱ्याला गज, कोयत्याने मारहाण करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक रतन कानडे यांनी फिर्याद दिली आहे. शेतीच्या रस्त्याची कुरापत काढून विनोद लक्ष्मण खांडेकर व इतर आठ जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Two killed in Malegaon accident