नांदगाव - मनमाड महामार्गावर अपघातात दोघे ठार
By प्रसाद गो.जोशी | Updated: September 26, 2024 14:17 IST2024-09-26T14:17:45+5:302024-09-26T14:17:55+5:30
नांदगाव (संजय मोरे) : नांदगाव मनमाड महामार्गावर हिरेनगर फाट्यावर दोन चारचाकी वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला ...

नांदगाव - मनमाड महामार्गावर अपघातात दोघे ठार
नांदगाव (संजय मोरे) : नांदगाव मनमाड महामार्गावर हिरेनगर फाट्यावर दोन चारचाकी वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
अपघातामध्ये शिवाजी भास्कर देशमुख (रा. मोहाडी ता. दिंडोरी) आणि उषा नारायण महाजन (रा. पाचोरा जि. जळगाव) हे मृत झाले आहेत.
नांदगाव मनमाड महामार्गावर पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोघेजण जागीच मृत झाले . या अपघातात आशा शिवाजी देशमुख (५५) विकास शिवाजी देशमुख(३५), गराबाई अशोक देशमुख(६०) सर्वजण रा. मोहाडी (जि. नाशिक) व नारायण सुखदेव महाजन(७०) रा. पाचोरा हे चौघे गंभीर झाले आहेत. घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले स्थानिकांच्या मदतीने त्यांनी जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले.