मनमाड : पुणे-इंदूर महामार्गावर वेगाने जाणारा ट्रक व कार आणि मोटरसायकलवर पलटी होऊन अपघात झाला. या विचित्र अपघातात मोटरसायकलवरील प्रवीण मधुकर सोनवणे (रा.मनमाड) आणि रवींद्र अशोक गोडसे (रा.अनकवडे) या तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने कारमधील सर्व जण बचावले आहेत.
या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक (क्रमांक (एम पि ०९ जी एस ५४५३) वरील चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-इंदौर महामार्गावर रोज अपघात होत असल्याने हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला असून बेथेल चर्च या परिसरात असलेले गतिरोधक धोकादायक बनले आहेत.
या ठिकाणी दिशादर्शनासाठी फलक नसल्यानेदेखील अपघात होत असून पथकर नाका कंपनीने याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
Web Title: Two killed in bizarre accident
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.