औरंगाबादरोडवरील अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:36 IST2018-12-01T00:36:31+5:302018-12-01T00:36:49+5:30

औरंगाबाद महामार्गावरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 Two killed in an accident near Aurangabad | औरंगाबादरोडवरील अपघातात दोन ठार

औरंगाबादरोडवरील अपघातात दोन ठार

नाशिक : औरंगाबाद महामार्गावरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  मिर्ची हॉटेल चौफुलीवर बुधवारी (दि़२८) रात्रीच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत फारुख शब्बीर खाटीक (२८, रा. पंचवटी) हा तरुण जागीच ठार तर अश्पाक मुन्शी (३४, रा. साक्री) हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भरधाव वेगात जात असताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व उलटून दुचाकीवर जाऊन आदळली़ यामध्ये फारूक खाटीक यांचा जागीच मृत्यू, तर अश्पाक मुन्शी हे गंभीर जखमी झाले़  औरंगाबादरोडवरील साईलीला लॉन्ससमोरील रस्त्याच्याकडेला असलेल्या झाडावर आदळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ योगेश पांडुरंग देवरे (३०, पंचवटी) या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (दि. २६) रात्री ११ वाजेच्या सुमारास योगेश देवरे हा दुचाकीने जात असताना त्याचे नियंत्रण सुटले व तो लिंबाच्या झाडावर जाऊन आदळला.

Web Title:  Two killed in an accident near Aurangabad