नाशिक-पेठ महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:32 IST2020-03-20T23:10:43+5:302020-03-21T00:32:30+5:30

गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-पेठ महामार्गावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घेऊन फरार झाला

Two killed in accident in Nashik-Peth highway | नाशिक-पेठ महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

नाशिक-पेठ महामार्गावर अपघातात दुचाकीस्वार ठार

दिंडोरी : गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-पेठ महामार्गावर मोटारसायकल व ट्रॅक्टरची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक वाहन घेऊन फरार झाला असून, पोलिसांनी त्यापैकी आयशरचालकाला ताब्यात घेतले आहे.
दहवी, ता. दिंडोरी येथील लक्ष्मण बाळू भोये (वय १९) हा चाचडगाव येथे लग्न सोहळ्यासाठी गेला होता. लग्न आटोपून मोटारसायकलने (क्र. एमएच १५ एफजे २८६४) जात असताना गंगासागरजवळ जाणाºया ट्रॅक्टरची मोटारसायकला जोरदार धडक बसली. याचवेळी नाशिककडून येणाºया आयशर (क्र. एमएच १६ एएफ ८९७१) ट्रकवर पडल्याने भोये जागीच ठार झाले. या घटनेची माहिती समजताच उमराळे बुद्रुक दूरक्षेत्रचे पोलीस नाईक धनंजय शिलवटे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व पळून गेलेल्या आयशरचालकाची माहिती पेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी आयशरचालकास अटक केली असून, पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Two killed in accident in Nashik-Peth highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.