दुचाकींची धडक, तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 13:20 IST2019-10-31T13:20:01+5:302019-10-31T13:20:12+5:30
ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद पिंपळनेर रस्त्यावरील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात आई मुलासह एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.

दुचाकींची धडक, तिघे ठार
ताहाराबाद : विंचूर-प्रकाशा महामार्गावरील ताहाराबाद पिंपळनेर रस्त्यावरील दुर्गा पेट्रोलपंपाजवळ दोन मोटारसायकलच्या अपघातात आई मुलासह एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. भाऊबीजच्या दिवशी झालेल्या अपघाताने शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हिरो होंडा स्पेलंडर एम एच ४१ ए के ९०८८ व नवीन युनिकॉन या दोन्ही मोटारसायकल समोरासमोर धडकल्याने युनिकॉन मोटारसायकल वरील शोभाबाई मोतीराम भामरे (४५), रवींद्र मोतीराम भामरे (२७) राहणार नांदवन ता.साक्र ी हे मायलेक व स्पेलंडरवरील काळू मोतीराम पवार (५५) रा.दसवेल ता.सटाणा असे तिघे जागीच ठार झाले. राजेंद्र सुखदेव पवार (४०) हे गंभीर जखमी झाले.पवार यांना मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत. दरम्यान दुर्गा पेट्रोल पंप परिसरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन साळवे यांनी केली आहे.