सिन्नरजवळ अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 22:37 IST2021-08-21T22:36:54+5:302021-08-21T22:37:52+5:30
सिन्नर : सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने दोघा मित्रांचा मृत्यू झाला. सिन्नरजवळील शाहू हॉटेल जवळ शुक्रवारी (दि. २०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

सिन्नरजवळ अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू
सिन्नर : सिन्नरकडून नाशिककडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून स्विफ्ट कारने धडक दिल्याने दोघा मित्रांचा मृत्यू झाला. सिन्नरजवळील शाहू हॉटेल जवळ शुक्रवारी (दि. २०) रात्री अकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.
नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल शाहू जवळ स्विफ्ट कारने पल्सर मोटासायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून जाणारे साजन भगवान वायचळे (२१) आणि सचिन किसन गोळेसर (२३) दोघेही रा. कुंदेवाडी दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच गोळेसर याचा मृत्यू झाला. तर, साजन वायचळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. साजन वायचळे हा मुसळगाव एमआयडीसी येथील प्रसिद्ध हॉटेल अंबिका खानावळचे मालक भगवान वायचळे यांचा मुलगा होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहे.