कसारा घाटात मध्यरात्री अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 23:03 IST2019-01-01T23:02:11+5:302019-01-01T23:03:05+5:30

इगतपुरी (जि. नाशिक) : नवीन कसारा घाटात मध्यरात्री भरधाव मोटारसायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

Two dead in midnight accident in Kasara Ghat | कसारा घाटात मध्यरात्री अपघातात दोन ठार

कसारा घाटात मध्यरात्री अपघातात दोन ठार

ठळक मुद्देअपघातानंतर पिक इम्प्रा महामार्ग सुरक्षा पथक व महामार्ग पोलीस यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

इगतपुरी (जि. नाशिक) : नवीन कसारा घाटात मध्यरात्री भरधाव मोटारसायकलने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
सोमवारी मध्यरात्री नवीन कसारा घाटात मोटारसायकलवरून (क्र . एमएच ०४ जेडब्लू ८३४५) जाणाऱ्या युवकांनी लतीफवाडी जवळ उभ्या असलेल्या ट्रकला (क्र . एमएच १८ एम ६९००) मागून जोरदार धडक दिली. यात किरण अशोक कलचिडा (वय २१, रा. आसनगाव) व साईनाथ अशोक कंकुषे (१७, रा. कसारा) या दोघांचा मृत्यू झाला, तर विनायक भास्कर डावरे (१६, रा. कसारा) हा तरुण गंभीर जखमी झाला. विनायकला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. किरण कालचिडा, साईनाथ कुंकुषे यांचे कसारा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर पिक इम्प्रा महामार्ग सुरक्षा पथक व महामार्ग पोलीस यांनी अपघातग्रस्तांना मदत केली.

Web Title: Two dead in midnight accident in Kasara Ghat

टॅग्स :Accidentअपघात