बागलाणमध्ये दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 01:23 IST2021-10-30T01:22:54+5:302021-10-30T01:23:42+5:30
सटाणा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.

बागलाणमध्ये दोघांची आत्महत्या
सटाणा : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली.
तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथील भाऊसाहेब देवराम दहिने (७०) यांनी दारुच्या नशेत विषारी औषध सेवन केले. हा प्रकार कुटुंबीयांना लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दरम्यान, मुंजवाड येथील विलास ऊर्फ भटा राजेंद्र बच्छाव (३५) या तरुणाने मळगाव शिवारात एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकारणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.