नाशिक : शहरातील पवननगर व म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या प्रकरणी संबंधित अंबड व म्हसरुळ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहील घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पवननगर पसिरातील अपहृत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा शुक्रवारी (दि. ३०) रोजी फिर्यादी यांचा मुलगा नेहमीप्रमाणे खेळण्यासाठी गेला असता, पुन्हा घरी परतला नाही, तसेच तो नातेवाइकांकडेही मिळून आला नाही, त्यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याला फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करीत मुलाच्या वडिलांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुसरी घटना म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, परिसरातील एका महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या महिलेच्या अल्पवयीन मुलीस ३१ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस दाखवून पळवून नेले. या प्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशकातून दोन मुलांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 15:47 IST
नाशिक : शहरातील पवननगर व म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन मुलांचे अपहरण झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या प्रकरणी ...
नाशकातून दोन मुलांचे अपहरण
ठळक मुद्देअंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलाचे अपहरण अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुलाचे अपहरण म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण