दोन घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:34 IST2019-03-15T23:58:48+5:302019-03-16T00:34:15+5:30
शिखरेवाडी व जेलरोड पवारवाडी येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दोन घटनांमध्ये दोघांच्या आत्महत्या
नाशिकरोड : शिखरेवाडी व जेलरोड पवारवाडी येथे दोन वेगवेगळ्या घटनेत दोघा इसमांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिखरेवाडी प्रकाशनगर येथे भाच्याकडे चंद्रकांत मारुतीराव साळके (६९) रा. कल्याण यांचा भाऊ जिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल असल्याने रात्री झोपण्यासाठी येत होते. चंद्रकांत साळके यांनी भाच्याच्या राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली, तर दुसऱ्या घटनेत जेलरोड पवारवाडी येथील संतोष अशोक निकम (४७) याने गुरूवारी संध्याकाळी राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.