शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

चामरलेणीवर अडकलेल्या दोघा भावांची अग्निशमन दलाने केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 15:36 IST

रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले.

ठळक मुद्दे\दोघेही डोंगरच्या मध्यावरच अडकून पडलेदोरखंडाच्या सहाय्याने तरूणांना सुरक्षितरित्या उतरविले

नाशिक : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगला गेलेले दोघे चुलतभाऊ डोंगरमाथ्यावर पोहचल्यानंतर रविवारी (दि.२३) भरकटले. स्थानिक युवकांनी पंचवटी अग्निशमन, म्हसरूळ पोलीसांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत दोरखंडाच्या सहाय्याने दोघांना दीड तासांच्या प्रयत्नानंतर सुरक्षितरित्या खाली उतरविले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पेठरोड दत्तनगर येथे राहणारे दिपक कोठुळे (२३), ऋ षिकेश कोठुळे (१६) हे दोघे चुलत भाऊ नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी म्हसरूळ बोरगड शिवारातील चामरलेणी डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले होते. हे दोघेही डोंगरावर चढल्यानंतर त्यांना माथ्यावर एका भल्यामोठ्या सर्पाने दर्शन दिले. यामुळे दोघेही घाबरले आणि बिथरून सैरावैरा पळाले असता वाट चुकले. दोघेही डोंगरच्या मध्यावरच अडकून पडले. यावेळी मदतीसाठी दिपकने आपल्या मोबाईलद्वारे सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षात (१०० क्रमांकावर) संपर्क साधला. यावेळी पोलिसांनी त्वरित शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयाला माहिती कळविली. त्यानंतर तत्काळ हा ‘कॉल’ पंचवटी अग्निशमन उपकेंद्राला वळविण्यात आला. घटनेची माहिती मिळताच बंबचालक बाळू पवार, फायरमन नितीन म्हस्के, धीरज पाटील, मंगेश पिंपळे हे आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तत्काळ चामरलेणी गाठली.तोपर्यंत म्हसरूळ पोलीस कर्मचारी ए.एन.पारधे, चामरलेणी वनविभागाच्या बीटचे वनमजूर भाऊराव चारोस्कर हेदेखील पोहचलेले होते. यावेळी या सगळ्यांनी मिळून दोरखंडाच्या सहाय्याने दोघा तरूणांना सुरक्षितरित्या डोंगरमाथ्यावरून खाली साडेअकरा वाजेच्या सुमारास उतरविले.

टॅग्स :Trekkingट्रेकिंगNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात