गोविंदनगरला दोन दुचाकींची जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 01:35 IST2018-12-15T01:35:03+5:302018-12-15T01:35:18+5:30

गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी वाहनांना आग लावून पेटविल्याची घटना गुरुवारी (दि़१३)घडली.

Two bikes of Govindnagar burn | गोविंदनगरला दोन दुचाकींची जाळपोळ

गोविंदनगरला दोन दुचाकींची जाळपोळ

नाशिक : गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन दुचाकी वाहनांना आग लावून पेटविल्याची घटना गुरुवारी (दि़१३)घडली. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅकजवळील चौक नंबर चारमधील रहिवासी उमेश गायकवाड यांची सीटी १०० (एमएच १५ जीएच ५७७५) व त्यांचा मित्र रुफालचंद भांगरे यांची यामाहा एफझेड
( एमएच १५ ईयू ६०६५)दुचाकी अज्ञात समाजकंटकांनी गुरुवारी पेटवून दिली़ यामध्ये दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात समाजकंटकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two bikes of Govindnagar burn