कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:22 IST2018-10-12T00:21:48+5:302018-10-12T00:22:47+5:30
पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार ठार
नाशिक : पिंपळगाव खांब-वडनेर गेट रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकीवरून जात असताना अचानकपणे रस्त्यावरून कुत्रा आडवा पळाल्याने दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. वाहन घसरून दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, त्र्यंबक बहिरू खताळ (५७, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. रविवारी (दि.७) सकाळी त्र्यंबक खताळे हे त्यांच्या दुचाकीने (एमएच १५, डीएक्स ५२५) या क्रमांकाच्या मोटारसायकलीवरून घराच्या दिशेने नाशिककडे येत होते. ते काही अंतर चालून उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळगाव खांब ते वडनेर गेट रोेडने भरधाव वेगाने जात असताना दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा रस्त्यात आल्याने त्यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला यावेळी दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने तत्काळ खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.