अपघातात दोघा दुचाकीस्वारांनी गमावला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:16 PM2019-09-01T16:16:14+5:302019-09-01T16:20:11+5:30

दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ....

Two bicyclists lost their lives in the accident | अपघातात दोघा दुचाकीस्वारांनी गमावला प्राण

अपघातात दोघा दुचाकीस्वारांनी गमावला प्राण

Next
ठळक मुद्देदुचाकी समोरच्या वाहनावर पाठीमागून आदळलीदुभाजकावर दुचाकी आदळून अपघात

नाशिक : दुभाजकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर चौक परिसरात घडली. भूषण शिवाजी अहिरे (३८, रा. म्हसरूळ) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहिरे हे शुक्रवारी (दि.३०) त्यांच्या दुचाकीने (एमएच ४१, झेड ८५७५) पेठ नाक्याकडून आरटीओ कार्यालयाच्या दिशेने जात होते. त्यावेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात अहिरे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड ते उपनगर दरम्यान घडली. भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यश देवीदास कोकाटे (१९, रा. गोरेवाडी) हा युवक गुरुवारी (दि.२९) त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच १५, सीएफ १५३८) वर जात होता. अचानक त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरील समोरच्या वाहनावर पाठीमागून आदळली. या अपघातात यश याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Two bicyclists lost their lives in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.