रंगेहात ताब्यात : ट्रकचालकाला लुटून पळणाऱ्या चोरट्यांना ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 15:02 IST2020-07-14T15:00:42+5:302020-07-14T15:02:03+5:30
पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले.

संग्रहित छायाचित्र
नाशिक : येथील उड्डाणपूलावरून मार्गस्थ होणारा एक ट्रक अडवून त्या ट्रकचालकाला दमदाटी करत बळजबरीने त्याच्याजवळील पाकिटमधील रक्कम काढून घेत पोबारा करणाऱ्या भुरट्या चोरट्यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्काळ बेड्या ठोकल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, पंचवटी पोलीस ठाणेचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक सत्यवान पवार, सहाय्यक उपनिरीक्षक संजय वानखेडे, हवालदार सुरेश नरवडे, महेश साळुंके आदि इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतून गुन्ह्याचा तपास करून पंचवटीकडे उड्डाणूपूलावरून परतत होते. यावेळी उड्डाणपूलावर दोघे इसम एका ट्रकचालकाला दमदाटी करत मारहाण करण्याचा प्रयत्नात असल्याचे दिसले. पोलिसांची गाडी जवळ येत असल्याचे बघून या दोघांनी पळण्यास सुरूवात केली. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांनी ट्रकचालकाकडे विचारणा केली असता त्याने पैसे घेऊन मारहाण करून दोघे पळून गेल्याचे सांगितले. पथकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनातून त्यांचा पाठलाग करत ताब्यात घेतले. संशयित उमेश गणेश भुजबळ (रा.माणिकनगर, सिडको), राहूल नारायण जाधव (रा.अमृतधाम) अशी दोघा लूटारूंची नावे आहेत.
त्यानंतर पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांनी चालकाचे बळजबरीने हिसकावलेले साडे तीनशे रूपये आढळून आले. याबाबत दोघांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.