वाइनशॉपीतून रोकड चोरणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 16:38 IST2018-08-31T16:37:52+5:302018-08-31T16:38:26+5:30
नाशिक : वाइनशॉपी वा दारू दुकानांना लक्ष्य करीत त्याच्या गल्ल्यातील रोकड बळजबरीने काढून फरार होणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़

वाइनशॉपीतून रोकड चोरणाऱ्या दोघांना अटक
नाशिक : वाइनशॉपी वा दारू दुकानांना लक्ष्य करीत त्याच्या गल्ल्यातील रोकड बळजबरीने काढून फरार होणा-या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे़
शिवाजीनगर येथील चिंटू सामदेव सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे अंबड औद्योगिक वसाहतीत परकेज नावाचे वाइन शॉप आहे. बुधवारी (दि़ २९) सायंकाळी सिंग दुकानात एकटे बसलेले असताना परिचित असलेले संशयित दीपक चंद्रकांत कसबे (रा. चिंचोली, ता. जि. नाशिक) व अजय निवृत्ती दोंदे (रा. उपनगर) हे दुकानात आले़ त्यांनी दमदाटी करीत दुकानाच्या गल्ल्यातील सुमारे साडेचार हजारांची रोकड बळजबरीने काढून फरार झाले होते़
अंबड पोलिसांनी संशयित कसबे व दोंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे़