लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.त्यात कोणी डॉक्टर तर कोणी इंजिनिअर, उद्योगपती, शेतकरी, व्यावसायिक, सरकारी सेवा व संसाराच्या रहाट गाडग्यात गुंतून गेले असतानाही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शाळा आणि त्यावेळचे मित्र घर करून होते. त्यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या शाळा सोबत्यांना हुडकून एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्याध्यापक अरुण गायकवाड, पर्यवेक्षक दिलीप अहिरे यांच्यासह शिक्षक उपस्थित होत.यावेळी कपिल चांडक, गणेश घाटकर, राजू सरगर, संदीप चांदवडकर, वैभव मोरे, प्रशांत शिंदे, पुरु षोतम बोरसे, नीलेश पवार, सुमित अनारे, तानाजी आरशेंडे, सचिन शर्मा आदींसह मित्र उपस्थित होते.कार्यक्र माचे नियोजन इगतपुरीहून प्रशांत कडू, संजय ढोन्नर, पुण्यातून पंकज पाटील, नाशिकमधून संदीप चांदवडकर यांनी सांभाळले.सोशल मीडियाद्वारे जमले मित्रफेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकमेकांना जवळ केले. त्यात हजेरीपटावरील ४० ते ४४ हून अधिक विद्यार्थी संपर्कात आले. त्यात इगतपुरी, मुंबई, नाशिक, पुणे, राजस्थान, हैदराबाद तसेच राष्ट्रीय सीमेपलीकडे दुबईहून सर्व लांब लांब गेलेल्या मित्रांनी एकत्र येऊन आणि इगतपुरीच्या महात्मा गांधी हायस्कूलमध्ये आपल्याच जुन्या दहावी ‘क’ च्या वर्गात शाळा भरवली.
वीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 01:25 IST
इगतपुरी : येथील महात्मा गांधी हायस्कूलमधील १९९९च्या बॅचमधील दहावीच्या विद्यार्थ्यांची तब्बल वीस वर्षांनी पुन्हा शाळा भरवली. दहावी उत्तीर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी निरनिराळ्या वाटेने जगाला सामोरे गेल्यानंतर प्रत्येकाचा संपर्क कमी होत गेला.
वीस वर्षांनंतर पुन्हा भरली शाळा !
ठळक मुद्देउजाळा : इगतपुरीत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा