सिन्नर : तालुक्यातील माळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.गुरूवारी मध्यरात्री ही घटना घडली. जोराने आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सुदाम रामभाऊ रोंगटे हे जखमी झाले. याबाबतची तक्रार एमआयडीसी पोलिसांनी दाखल करण्यात आली आहे. अपघातानंतर वाहनासह चालक पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:22 IST