शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकासचे अडीचशे कोटी रुपये पडून

By admin | Updated: September 22, 2016 01:11 IST

योजनांना ग्रहण : विकासकामे अडली

नाशिक : सध्या मोखाडा येथील कुपोषणामुळे चर्चेत आलेल्या आदिवासी विभागाचे अधिकारी विविध योजनांचा निधी खर्च करण्याबाबत अत्यंत उदासीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. वित्त विभागाने चार महिन्यांपूर्वी दिलेला सुमारे अडीचशे कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून असून त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांच्या हेतुविषयीच शंका घेतली जात आहे.राज्यातील आदिवासी बांधवांना विविध मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी राज्याच्या एकूण अंदाजपत्रकाचा नऊ टक्के निधी आदिवासी विभागाला दिला जातो. यात आदिवासींना व्यक्तिगत लाभाच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्याचबरोबर मूलभूत सुविधा आणि आदिवासींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारची कामे केली जातात. परंतु योजना आणि पायाभूत कामे या दोन्ही विषयांबाबत अधिकारी उदासीन असल्यानेच तरतूद करूनही रक्कम अखर्चित राहते. त्याचा अनुभव यंदाच्या वर्षीही येत आहे. राज्य सरकारचे अंदाजपत्रक संमत झाल्यानंतर १६ मे रोजी २३९ कोटी रुपये वित्त विभागाने आदिवासी विकास विभागाकडे वर्ग केले आहेत. परंतु त्याचाही विनियोग चार महिन्यांत न झाल्याने कोट्यवधी रुपयांची ही रक्कम वापराविना पडून आहे. त्यामुळे अनेक कामेही अर्धवट स्थितीत आहेत. आदिवासींना दळणवळणाची साधनेच उपलब्ध झाली नाही तर ते मूळ प्रवाहात कसे येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाचा निधी पायाभूत सुविधांसाठी वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याची चर्चा होत आहे. गेल्या वर्षीही कामे अडवून ठेवणे आणि नंतर त्यांचा पुन्हा समावेश करण्यामागे अशाच प्रकारची कारणे असल्याचे सांगितले जात होते. आता पुन्हा हेच कारण आहे काय याचा शोध आदिवासी विकास मंत्र्यांनी घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)आदिवासी विभागाकडे मुबलक निधी असतानादेखील तो खर्च करण्याची अधिकाऱ्यांची मानसिकताच नसते. परिणामी आदिवासी भागात कल्याणकारी योजनाच राबवता येत नाही. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण तसेच अन्य योजना राबविण्यासाठी मुळात काम करण्याची मानसिकता असेल तर अनेक प्रश्न सुटू शकतात.- आमदार निर्मला गावित,इगतपुरी- त्र्यंबक विधानसभा मतदार संघ