घरफोडीत साडेबारा तोळ्यांचे दागिने लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2022 01:34 IST2022-01-26T01:33:22+5:302022-01-26T01:34:31+5:30
गोविंदनगर परिसरात चोरट्याने चोरी करून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ४ ते १७ जानेवारीदरम्यान घडली.

घरफोडीत साडेबारा तोळ्यांचे दागिने लांबविले
नाशिक : गोविंदनगर परिसरात चोरट्याने चोरी करून अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना ४ ते १७ जानेवारीदरम्यान घडली. मल्हार सीताराम आगरकर (८३, रा. गोविंदनगर) यांच्या फिर्यादीनुसार चोरट्याने घरात शिरून घरातील सुमारे साडेबारा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.