शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

वाहन, गृह खरेदीतून कोटींची उलाढाल

By admin | Updated: October 21, 2015 23:45 IST

साधला ‘मुहूर्त’ : चारचाकीची खरेदी; फ्लॅटची नोंदणी

नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दसऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. या मुहूर्तावर शहरातील वाहन व गृह बाजारात खरेदी-विक्रीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली. अनेकांनी दुचाकी, चारचाकी खरेदीबरोबरच नवीन घर खरेदीची आगाऊ नोंदणी करत मुहूर्त साधला.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर वाहन, गृह खरेदीवर बहुसंख्य नागरिकांनी भर दिला. शहरात विविध ठिकाणी बहुसंख्य बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्प उभारले आहेत. दसरा तसेच आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नवरात्रोत्सवात बांधकाम व्यावसायिकांसह व वाहन विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात आगळ्यावेगळ्या पद्धतीने जाहिरात करण्यावर भर देण्यात आला. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांमध्ये जाहिरातींची स्पर्धा यावेळी बघावयास मिळाली. विविध सोयीसुविधांचा प्रचार-प्रसाराचा भडिमार करत विपणनच्या पद्धतीने आकर्षक सवलती व्यावसायिक वर्गाकडून जाहीर करण्यात आल्या होत्या. यामुळे बहुसंख्य नागरिकांनी जाहिरातींमधील माहिती वाचून खरेदी व चौकशीसाठी घराबाहेर पाऊले टाकल्याचे चित्र दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पहावयास मिळाले. शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभल्याचे सांगितले. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेकांनी गृहप्रकल्पाला भेटी देत चौकशी करून माहिती जाणून घेत सदनिकांची नोंदणी केली.त्याचप्रमाणे विविध दुचाकी-चारचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडूनदेखील दसऱ्याच्या मुहूर्तावर निवडक उत्पादनांची जाहिरात करत दुचाकी-चारचाकींच्या विविध सोयीसुविधांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून आले. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुचाकी-चारचाकींच्या दालनांमध्ये नागरिक ांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)