एकतर्फी प्रेमातून तरूणीवर डिझेल टाकण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:19+5:302021-09-25T04:14:19+5:30
मयूर दिलीप आहेर (२३ रा. भैरवनाथ नगर,चांदवड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित तरूणी आणि संशयित एकमेकांचे परिचित ...

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर डिझेल टाकण्याचा प्रयत्न
मयूर दिलीप आहेर (२३ रा. भैरवनाथ नगर,चांदवड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित तरूणी आणि संशयित एकमेकांचे परिचित असून, गुरूवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास तरूणी मुंबई नाक्याकडून काठे गल्ली सिग्नलच्या दिशेने जात असताना संशयिताने पाठलाग करीत तिची वाट अडविली व नागजी सिग्नल परिसरातील दुकाना नजीक संशयिताने फोन का उचलत नाही या कारणातून जाब विचारत युवतीस मारहाण केली. यावेळी तरूणीने येथून निघून जा असे म्हटल्याने संशयिताने एकतर्फी प्रेमातून लग्न करणार आहे की नाही ते सांग तूला आज जिवंत सोडत नाही असे म्हणून डिझेलने भरलेली बाटली स्वत:सह तरूणीच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. सदरची घटना रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच व तरूणीने आरडाओरड करताच संशयिताने पलायन केले. याप्रकरणी तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.