शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार

By admin | Updated: January 9, 2017 00:59 IST

शांतीलाल मुथा : फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे राज्य अधिवेशन


 चांदवड : देशातील अल्पसंख्य जैन संस्थांना अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संस्थापक शांतीलाल मुथा यांनी दिली.
येथील नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रमच्या प्रांगणात रविवारी झालेल्या एकदिवसीय राज्य अधिवेशनात ते बोलत होते. अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे राष्ट्रीय अध्यक्ष वल्लभ भन्साळी, राज्य अध्यक्ष अजितकुमार सुराणा, नेमिनाथ जैन संस्थेचे अध्यक्ष संपतलाल सुराणा, बेबीलाल संचेती, गौतम संचेती, प्रफुल्ल पारख, मोहनलाल चोपडा, दलिचंद जैन, जवाहरलाल आबड, सुदर्शन जैन, सुरेश पाटील, नरेंद्र फिरोदिया, प्रेमचंद झांबड, दिलीप चोप्रा, विजय कोठारी, प्रकाश पापडीवाल, शशिकांत पारख, सुनील कासलीवाल, वर्धमान लुंकड, निशा जैन, दादासाहेब पाटील, दिनेशकुमार लोढा, झुंबरलाल भंडारी, अरविंद भन्साळी, महावीर चोपडा, नंदकुमार ब्रह्मेचा, सुनील चोपडा, कांतीलाल बाफना, डॉ. सुनील बागरेचा, शांतीलाल अलिझाड, सुमतीलाल सुराणा आदि मान्यवर उपस्थित होेते.
देशभरातील सर्व शैक्षणिक संस्थांना एकत्र करून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सन २००३ मध्ये भारतीय जैन संघटनेअंतर्गत कार्यरत असलेल्या फेडरेशन आॅफ जैन एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून बऱ्याच समस्या दूर केल्या जात आहेत, असे शांतीलाल मुथा यांनी सांगितले. प्रवेशाबाबत वक्त्यांंनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रवेशासाठी टक्केवारीची अट असल्याने अल्पसंख्याकांना अडचणी येत असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष वल्लभ भन्साळी यांनी सांगितले. या अडचणी सोडविण्यासाठी फेडरेशन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात तंत्रज्ञान, मूल्यशिक्षण, संविधान, शेती विज्ञान, डिजिटल तंत्रज्ञान, क्रीडा व योग आदि विषयांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात येणार असल्याची माहितीही भन्साळी यांनी दिली.
अधिवेशनाचे उद्घाटन आकाशात फुगे सोडून करण्यात आले. प्रतिमापूजनाने व नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक राज्य अध्यक्ष अजितकुमार सुराणा यांनी, तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. तुषार चांदवडकर व संगीता बाफना यांनी केले. संस्थेची माहिती डॉ. महेश संघवी, प्रा. संचेती यांनी दिली. यावेळी बेबीलाल संचेती, प्रा. कैंजन संघवी, दलिचंद जैन यांची भाषणे झाली. एकदिवसीय अधिवेशनास देशभरातील एक हजार प्रतिनिधी उपस्थित होेते.
अधिवेशन यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, प्रशास्कीय अधिकारी पी. पी. गाळणकर व सर्व शाखाचे प्राचार्य, शिक्षकांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)