ट्रक-मोटरसायकल अपघात एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 19:28 IST2019-05-06T19:27:37+5:302019-05-06T19:28:19+5:30

कंधाणे : ता. बागलाण सटाणा डांगसौदाणा रोडवरील कंधाणे येथील वडफाटयाजवळ मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात बांधकाम कारागीर विजय कडीवाल (४२) हे गंभीर जखमी झाले आंहे.

Truck-motorcycle accident is a serious injury | ट्रक-मोटरसायकल अपघात एक गंभीर जखमी

मोटरसायकल व ट्रक यांच्यात झालेला अपघात.

ठळक मुद्देअपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक

कंधाणे : ता. बागलाण सटाणा डांगसौदाणा रोडवरील कंधाणे येथील वडफाटयाजवळ मोटरसायकल व मालवाहतुक ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात बांधकाम कारागीर विजय कडीवाल (४२) हे गंभीर जखमी झाले आंहे.
मालकाची दुचाकी (एम एच-४१ एच ४९१५) घेवुन कामगार विजय कर्डीवाल सटाणा येथे जात असतांना सटाण्याहुन डांगसौदाणेकडे येणाऱ्या ट्रकची (एम एच ०४ बीयु १७५४) हयांच्यात कंधाणे येथील वडफाटयाजवळ समोरासमोर धडक झाली. त्यात मोटरसायकलस्वार विजय कर्डीवाल गंभीर जखमी झाले असुन घटनास्थळावरील प्रत्यक्ष दर्शनींच्या सांगण्यावरून मोटरसायकल स्वार यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात स्थळावरून जखमीला खाजगी वाहनाद्वारे सटाणा ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आल.े जखमीला डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथे पाठविण्यात आले. अपघातातील जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहीती नातेवाईकांनी दिली.

Web Title: Truck-motorcycle accident is a serious injury

टॅग्स :Accidentअपघात