ट्रक दरीत कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:15 IST2021-06-03T22:21:27+5:302021-06-04T01:15:00+5:30

नाशिक : जुना कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे.

The truck crashed into a ravine, killing the driver | ट्रक दरीत कोसळून चालक ठार

ट्रक दरीत कोसळून चालक ठार

ठळक मुद्दे चालक सोमनाथ भिकाजी उशिरे हा मरण पावला

नाशिक : जुना कसारा घाटात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक दरीत कोसळून झालेल्या अपघातात चालक ठार तर क्लिनर जखमी झाला आहे. मुंबईहून नाशिककडे ट्रक (क्रमांक एमएच १५ जेजी ०२९७) जात असतांना जुन्या कसारा घाटात गुरुवारी (दि.३) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कसारा घाटातील दरीत ३०० फूट खाली जाऊन कोसळला.

त्यात गाडीचा चालक सोमनाथ भिकाजी उशिरे (वय २३ वर्ष रा .नाशिक ) हा मरण पावला तर गाडीचा क्लिनर तुषार शिंदे (२७) हा गंभीररित्या जखमी झाला. त्याला इगतपुरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक चालक सोमनाथ भिकाजी उशिरे व क्लिनर तुषार शिंदे यांना दरीतून वर काढण्यात आले. पहाटेच्या अंधारामुळे ट्रक चालक व क्लिनर दोघांनाही शोधण्यात अडथळा येत होता.

Web Title: The truck crashed into a ravine, killing the driver