घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 00:52 IST2021-10-18T00:50:55+5:302021-10-18T00:52:14+5:30
मालेगाव तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

घोडेगावनजीक ट्रकची धडक, तळवाडेचा इसम ठार
मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील तळवाडे येथील मौलाना अफजल हे मनमाड येथे दावतनगर भागात इमाम म्हणून काम करीत होते. मालेगावी ते साडूकडे मुलांना सोडण्यासाठी आले होते. तेथून पत्नीसह मनमाडकडे परत जाताना घोडेगाव चौकीच्या पुढे जळगाव चोंढीनजीक पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने ते जागीच ठार झाले, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मौलाना तौसिफ यांचा फोन आल्याने सामाजिक कार्यकर्ते शफीक ॲन्टिकरप्शन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मनमाड येथेही कळविण्यात आले. जखमी महिलेस खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.