नाशिक : येथील पाथर्डीफाटा येथून लग्नासाठी वर्हाड घेऊन घोटीकडे निघालेलाटेम्पो मुंबई-आग्रा महामार्गावर वालदेवी नदीजवळ उलटल्याची घटना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दोन व्यक्ती ठार तर चाळीस प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश असल्याचे समजते.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पाथर्डीफाटा नाशिक येथून लग्नाचे वर्हाड घोटीकडे टेम्पोमधून (एम.एच. डीके २०९०) निघाले होते. महामार्गावरून भरधाव जात असलेल्या या टेम्पोचालकाचा वालदेवी नदीच्या जवळ ताबा सुटल्याने ट्रक अपघातग्रस्त झाला. अपघाताची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस, राज्य शासनाच्या १०८ क्रमांकावर अपात्कालीन सेवा देणा-या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखळ झाले. १०८च्या दोन रुग्णवाहिकांनी प्रत्येकी १५ व १० जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उर्वरित जखमींना खासगी वाहनाने जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले होते. या अपघातात कार्तिक दीपक माळी (वय ५) गोपाळ रमेश पवार (२५) यांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत वाडीव-हे पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात चाळीस जखमी झाले असून पाच रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदशळे यांनी दिली आहे. सर्व जखमींवर अपात्कालीन कक्षात उपचार सुरू आहेत.
नाशिकवरून वर्हाड घेऊन निघालेला टेम्पो महामार्गावर उलटला; पाच वर्षीय मुलासह एक युवक ठार; चाळीस जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 14:47 IST
या अपघातात कार्तिक दीपक माळी (वय ५) गोपाळ रमेश पवार (२५) यांचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींवर नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
नाशिकवरून वर्हाड घेऊन निघालेला टेम्पो महामार्गावर उलटला; पाच वर्षीय मुलासह एक युवक ठार; चाळीस जखमी
ठळक मुद्दे१०८च्या रुग्णवाहिकांनी प्रत्येकी १५ व १० जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले ट्रकचालकाचा वालदेवी नदीच्या जवळ ताबा सुटल्याने ट्रक अपघात