ट्रक आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, 4 जण जखमी; उड्डाणपुलावर वाहतूक खोळंबली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 14:34 IST2021-08-02T14:22:02+5:302021-08-02T14:34:01+5:30
Nashik Accident : स्कॉर्पिओसह कार असलेला हा कंटेनर, या ट्रकवरून नेला जात होता. समोरून जाणाऱ्या या महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली.

ट्रक आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, 4 जण जखमी; उड्डाणपुलावर वाहतूक खोळंबली
नाशिक - नाशिक शहरातून जाणाऱ्या 6 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरवर झालेल्या अपघाताने एका बाजूची वाहतूक खोळंबली आहे. 172 फुटी महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला, 4 चाकी वाहनं घेऊन जाणाऱ्या कंटेनरनं धडक दिली. या दोन्ही महाकाय वाहनांची टक्कर एवढी जोरदार होती की याचा आवाज तब्बल दीड किलोमीटर अंतरापर्यंत अनेकांना ऐकू गेला.
स्कॉर्पिओसह कार असलेला हा कंटेनर, या ट्रकवरून नेला जात होता. समोरून जाणाऱ्या या महाकाय क्रेन नेणाऱ्या ट्रकला मागून धडक दिली. ही टक्कर इतकी जोरात होती की या क्रेनच्या कॅबिनचा पार चेंदामेंदा झाला. यात बसलेल्या चौघांना दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, मुंबई नाका पोलीस दाखल झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिक शहरातून जाणाऱ्या 6 किलोमीटर लांबीच्या फ्लायओव्हरवर झालेल्या अपघाताने एका बाजूची वाहतूक खोळंबली आहे.#Nashik#ACCIDENTpic.twitter.com/uKUyDtNJlH
— Lokmat (@MiLOKMAT) August 2, 2021