त्र्यंबकेश्वरला अर्धातास बेमोसमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:37 IST2021-03-23T22:00:11+5:302021-03-24T00:37:55+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.

त्र्यंबकेश्वरला अर्धातास बेमोसमी पाऊस
त्र्यंबकेश्वर : येथे सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साधारणतः अर्धातास चांगलाच पाउस झाला. ढगांचा गडगडाट करीत विजा चमकल्या व काही वेळच पावसाला जोरदार सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच वितरण कंपनीकडून खबरदारी म्हणुन विद्युत प्रवाह बंद करण्यात आला.
दरम्यान मंगळवारी त्र्यंबकराजाचे मंदिर दर्शनार्थींसाठी खुले होते. काही मोजकेच भाविक दर्शनाला येत होते.
सकाळपासुन निरभ्र आकाश असल्याने दुपारनंतर ढग जमा होउ लागले व कालांतराने ढगांचा गडगडाट होत पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या बेमोसमी पावसाच्या हजेरीने यात्रेकरु भाविक व व्यावसायिकांची मात्र तारांबळ उडाली. एकाएकी पाउस सुरु झाल्याने सर्वत्र पळापळ सुरु झाली होती.