शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईचे संकेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:40 IST

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही. त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.

ठळक मुद्देहल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही.त्र्यंबक शहराचे उदाहरण घेतले तरी त्र्यंबकेश्वरला नगरपरिषद आहे. शहराला आज दोन मोठ्या जलाशयातुन पाणी सोडले जाते. तरी साधारणत: मार्च एप्रिल पासुन गावात दिवसाआड पाणी सोडण्याची पाळी येत असते. योजना तयार करतांना वर्षभर पाणी पुरेल असे सांगितले गेले होते. पण उन्हाची तिव्रता वाढल्यावर पाण्याचे जलाशय आटु लागले आहेत.तालुक्यात तर यापेक्षा अवघड परिस्थिती आहे. तालुक्यात तर एकही मोठा प्रकल्प नाही. नाला बांध, केटी बंधारे, पाझरतलाव, चिंचवड कोण,े बेझे आदी लघु पाटबंधारे योजना आहेत. पण त्या १२४ गावांना पुरणार? तीन ते चार मेजर प्रकल्प आहेत पण त्यांची अडथळ्यांची शर्यत अजुन संपलेलीच नाही. त्याला अजुन किती काळ लागेल हे पाटबंधारे विभागालाच ठाऊक !त्र्यंबकेश्वर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती अशी आहे की येथील जमिन डोंगर उताराची तसेच आदिवासी दुर्गम भागात तालुका विखुरलेला आहे. येथे एका जागी वस्तीची गावे कमी असुन एका एका गावाला पाच ते सहा वाड्या, पाडे असल्याने या गावांना ग्रामिण सुविधा देणे जिकीरीचे काम असते. पुर्वी वसाहती करतांना अगोदर पाण्याची सोय पाहुनच वसाहती होत असत. पण हल्ली पर्यावरणाचा समतोल बिघडला.गेल्या काही वर्षापासुन भुतपुर्व जिल्हाधिकारी यांच्या कार्यकाळात शक्य तो टंचाई प्रस्ताव पाठविले की मंजुरच केले गेले नाही. टंचाई प्रस्तावाची प्रक्रि या देखील अवघड करु न ठेवली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांमार्फत एखाद्या गावचा टंचाई प्रस्ताव पाठविला की, तहसिलदार गटविकास अधिकारी व जि.प.लघुपाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अशा तीन अधिकाऱ्यांची समिती व्हेरीफिकेशनसाठी पुनश्च टंचाई ग्रस्त गावांना भेट देउन गावाच्या तीन किलोमीटर परिसरात कुठे ग्रामपंचायतीची अगर खाजगी विहीर, पाण्याचा स्त्रोत नजरेस पडले की हे पाणी शाखा अभियता यांच्या १५ दिवस पुरेल की महिनाभर पुरेल असा अंदाज घेउन प्रस्ताव फेटाळला जात होता.त्र्यंबकेश्वर पंचायत समतिीने तयार केलेल्या सन २०१९ टंचाई आराखड्यात जानेवारी ते मार्च पहिला टप्पा जानेवारी मार्च व दुसरा टप्पा एप्रिल ते जुन दुसरा टप्पा या टप्प्यात टंचाई आराखडा येत असतो. आराखडा स्वत: मतदार संघाच्या आमदार, तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधार खात्याचे उपअभियंता यांच्या स्वाक्षरीने तयार करु न तो जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुर होत असतो. त्यानंतर टंचाईवर खर्च करण्याची परवानगी मिळत असते.पहिल्या टप्प्यात मार्चपर्यंत नियोजित टंचाईयुक्त २० गावे व ७७ वाड्या,पाडे यांचा टंचाई युक्त गावांमध्ये समावेश केला होता. तथापि सुदैवाने या गावांना अद्याप पर्यंत टंचाई परिस्थिती जाणवली नसली तरी सध्याच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टंचाई प्रस्ताव येण्याचे संकेत आहेत.एप्रिल ते जून या दुसऱ्या टप्यात नियोजित टंचाई ग्रस्त गावे ८५ व १८३ वाड्या, पाडे टंचाईत येतील असा अंदाज या आराखड्यात व्यक्त केला असला तरी गत वर्षी केवळ बोटावर मोजता येतील एवढेच म्हणजे दोन गावे व २१ वाड्या, पाडे इतके प्रस्तावच मंजुर करण्यात आले होते. ही दोन गावे म्हणजे मुळवड व सोमनाथनगर या गावांनाच शेवटपर्यंत टँकर सुरु होते. तसे प्रस्ताव तर भरपुर दाखल होवूनही काही ना काही कारण दाखवुन ते फेटाळण्यात आले होते.