शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य

By admin | Updated: March 7, 2015 00:04 IST

त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य

  नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिलर््िंाग मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुले, पाने घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर होऊ लागल्याने या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी होणाऱ्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होणे शक्य आहे. रविवारी दुपारी श्री त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाची मासिक बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणे व बाहेरील भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा विषय विश्वस्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. मुळातच जानेवारी महिन्यात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेचा विषय घेऊन भाविकांना गर्भगृहात फुले, पाने व पूजेचे साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली, त्यावेळी मंदिर सुरक्षेसाठी स्कॅनिंग मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाची संपूर्ण माहिती जमा करण्याची व्यवस्था केली जावी, अशी मागणी काही विश्वस्तांनी केली होती, परंतु त्यावर फारशी कार्यवाही झालेली नाही. मात्र भाविकांना मंदिरात फुले नेण्यावर लादलेल्या बंदीमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. देशातील कोणत्याही देवस्थानात पूजेचे साहित्य नेण्यास मज्जाव नसल्याचे सांगत विश्वस्त मंडळातील श्रीमती ललिता शिंदे यांनी या संदर्भात विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी केली आहे.