शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

By admin | Updated: July 29, 2014 00:56 IST

त्र्यंबकला पहिल्याच सोमवारी पन्नास हजार भाविकांची गर्दीत्

र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी त्र्यंबकला साधारणत: पन्नास हजारांवर भाविकांनी गर्दी केली होती. लगोलग दोन दिवस आणि रमजान ईदची उद्याची सुटी पाहता येथे येणाऱ्या भाविकांची संख्या विभागून गेली. चौथ्या शनिवारी शासकीय सुटी त्यात शनि अमावास्या, फेरीला जाणारी मंडळी एक दिवस अगोदरच येतात. त्यामुळे असणाऱ्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी झालेली गर्दी आणि पहिलाच श्रावणी सोमवार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.त्र्यंबकला विशेष करून तिसऱ्या सोमवारचे आकर्षण असते. त्यावेळेस मात्र ४ ते ५ लाख भाविक येतात. परिक्रमेसाठी जाणाऱ्या भाविकांनी नेहमीप्रमाणे चिखलातून जाण्याचा आनंद मात्र सिमेंटच्या रस्त्यामुळे घेता आला नसला तरी काटे कुटे, चिखलामुळे होणारी उचलटाक मात्र कमी झाली आहे. नदी-नाल्याच्या प्रवाहाचीदेखील पुलांमुळे गैरसोय कमी झाली आहे. अर्थात यावेळेस गर्दी तशी नगण्यच होती. दर्शनार्थींना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजाने प्रवेश मिळत होता. अनेकांना पेड दर्शनाबाबत माहिती नसल्याचे आढळून आले. त्यासाठी देवस्थान ट्रस्टने माहिती फलक लावावेत. अशी लोकांची सूचना आहे. कोणताही गैरप्रकार अगर अनुचित प्रकार न घडता भाविकांना दर्शन सुलभ झाले. देवस्थान मॅनेजर, विश्वस्त आणि कर्मचारी जातीने लक्ष देत होते. नगरपालिका मुख्याधिकारी तथा देवस्थान सचिव एन. एम. नागरे हेदेखील गर्दीचे नियोजन करून भाविकांची दर्शन व्यवस्था सुलभ करीत होते. (वार्ताहर)