आदिवासी धावपटूंचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:17 IST2019-02-18T00:15:42+5:302019-02-18T00:17:15+5:30
पेठ : सिन्नर अॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

सिन्नर मिनी मॅरेथॉन स्पर्धोत नाचलोंढी व घनशेत येथील विजयी खेळाडूंसमवेत प्रशिक्षक भगवान हिरकूड.
पेठ : सिन्नर अॅथेलेटिक असोसिएशन व निमा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिन्नर मिनी मॅरेथॉनमध्ये पेठ तालुक्यातील नाचलोंढी व घनशेत येथील जिल्हा परिषद शाळेतील बाल धावपटूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रशिक्षक भगवान हिरकूड यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी खेळाडूंनी सुयश संपादन करत बक्षिसांची लयलूट केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या मुलांनी क्र ीडा प्रकारात आदिवासी भागाचे नाव चमकवले आहे.
यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे
गट -१२ वर्ष मुले -
अनिल चौधरी-प्रथम नाचलोंढी, प्रवीण चौधरी-द्वितीय घनशेत, रोशन वड-चतुर्थ घनशेत, धनराज पवार-पाचवा नाचलोंढी.
गट -१२ वर्ष मुली
सानिका चौधरी-प्रथम नाचलोंढी, भारती चौधरी-द्वितीय नाचलोंढी, रिंकू चौधरी-तृतीय घनशेत, शालिनी चौधरी-चतुर्थ घनशेत, भारती चौधरी-पाचवी घनशेत
गट -१४ वर्ष मुले
सुरेश चौधरी-तृतीय नाचलोंढी, अजय महाले-चतुर्थ घनशेत, सुनील चौधरी-पाचवा नाचलोंढी.
गट -१४ वर्ष मुली
रविना चौधरी-प्रथम नाचलोंढी, रेखा शिंगाडे-द्वितीय घनशेत, कावेरी सहारे-तृतीय घनशेत, दीक्षा सीताड-चतुर्थ घनशेत, दुर्गा चौधरी-पाचवी.गट -१८ वर्ष मुलेवसंता चौधरी-द्वितीय नाचलोंढी
संदीप चौधरी-तृतीय नाचलोंढी
गट -१८ वर्ष मुली
सरस्वती चौधरी-प्रथम नाचलोंढी
गट - पुरु ष खुला
रोहिदास भोंबे-प्रथम नाचलोंढी
आकाश शेंडे- द्वितीय नाचलोंढी
गट - महिला खुला
सुशीला चौधरी-द्वितीय नाचलोंढी
विनता भोंबे-तृतीय नाचलोंढी.